बाप गेला की डोक्यावरचे छप्पर उडते
बाप हा सुरक्षेची ढाल
भीती वाटली तर तोंडातून बापरे निघते
पण यातना आई चीच आठवण आणतात
तोंडातून अग आईगच निघते
म ती साधी सुई टोचली कीवा
असो जीव घेण्या यातना
बाळंतिणीला कधी कोणी
बाप रे बाप रे ओरडतांना ऐकले का
तेव्हा आईच आठवते
साने गुरुजी म्हणत
राजा तिन्ही जागाच
आई विना भिकारी
बाळ आईच्या पोटातून मांडीवर येतं
त्या पदरा मागे त्याला आत असल्याचाच भास होतो
आकार वाढत जातो
मांडी लहान होत जाते
पण कितीही मोठा झाला
तरी
ती हक्काची मांडी नि पदर असतोच
डोकं टेकवून निर्धास्त झोपायला
ती पिल्ले पण निर्धास्त असतात त्या माऊली च्या पंखा खाली
तुम्ही खूप उंच उडाले बाळांनो
साता समुद्रा पार गेले
आनंद वाटतो
या अधून मधून ह्या मांडीवर तिघे
उजवी कडे श्रीधर डावीकडे माधव नि मधे चारू
जगाल तुम्ही बालपण नि मी तारुण्य
बाबा बघतील कौतुकाने तुमची डोकी आत व बाकी तीन दिशेनी बाहेर
आम्हा साठी तुम्ही वा तुमच्या साठी माधव नेहेमी लहानच राहणार
असेच आनंदी रहा व लौकर लौकर भेटा
नाहीच जमले तर हा पदरच येईल तुम्हाला नि
नातवंडांना घ्यायला उराशी..
Happy mother’s day
आई बाबा
08/05/2021